‘पबजी’ नवीन नावाने लॉंच होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली, दि. 6- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारत सरकारने एकाच वेळी पबजीसह 180 गेम आणि ऍप्सवर बंदी घातली होती. तेव्हापासून आतापर्यंत पबजी मोबाइल भारतात परत येणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत भारतात अनेकवेळा पबजी मोबाइल लॉंच झाल्याची बातमी समोर आली आहे; परंतु अधिकृतपणे याची खातरजमा झालेली नाही किंवा पबजी मोबाइल अद्याप भारतात सुरू झालेला नाही.

मात्र, आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की लवकरच पबजी मोबाइल भारतात लॉंच होईल. मात्र, यावेळीही लॉंचची तारीख गुलदस्त्यातच आहे. नव्या रिपोर्टमध्ये असेही बोलले जात आहे की भारतात पबजी मोबाइल ‘बॅटलग्राउंड्‌स मोबाइल इंडिया’च्या नावाने बाजारात येऊ शकते. कंपनीने फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनेलचे नावही बदलले आहे.

गेल्या आठवड्यात पबजी मोबाइल इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक टीझर रिलीज करण्यात आला होता पण नंतर तो डिलीटही करण्यात आला. क्राफ्टनने इन्स्टाग्रामवर पबजी मोबाइलच्या री-लॉंचचा टीझरही जारी केला असून ‘All New PUBG MOBILE coming to India. Share with your Squadmates NOW! ‘ असा मथळा वापरला गेला. काही महिन्यांपूर्वी कंपनीने एका निवेदनात म्हटले होते की ते स्थानिक सरकारच्या नियमांनुसार डेटा सुरक्षित करेल. याव्यतिरिक्त, स्थानिक डेटा सेंटरमध्येच हा डेटा संग्रहित केला जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.