आता रिमोट कंट्रोलने मेंदूवर नियंत्रण

सॅन फ्रान्सिस्को : वायरलेस उपकरणांचा वापर करून मानवाच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. नेचर बायोटेक्नॉलॉजी जर्नलमध्ये याबाबत लेख प्रसिद्ध झाला आहे. मानवाच्या शरीरात एक उपकरण इम्प्लांट करून रिमोट कंट्रोलच्या साह्याने त्याच्या मेंदूवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

या तंत्रज्ञाचा उपयोग पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होणार आहे. गेली 15 महिने या तंत्रज्ञानावर संशोधन सुरु होते. त्यासाठी काही रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. या रुग्णांना या प्रयोगाची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांची दैनंदिन कामे व्यवस्थित सुरु होती. उपकरणाच्या आधारे संशोधकांना मिळणाऱ्या माहितीचा वापर करून त्या रुग्णांच्या मेंदूतील हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.

खरेतर पार्किन्सन्स सिजर डिसॉर्डर्स आणि डिप्रेशन या विकारांमध्ये रुग्णांच्या मेंदूतील हालचालींवर नजर ठेवणे किंवा त्या हालचाली नियंत्रित करणे अवघड असते. रुग्ण रुग्णालयात आहेत तोपर्यंत ते शक्य असते. परंतु रुग्ण घरी गेला कीअवघड असते. परंतु आता तेही शक्य होणार आहे.

या शोधाचे जनक फिलिप स्टार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी रुग्णाच्या शरीरात एक इलेक्ट्रोड इम्प्लांट करून हि उपलब्धी शक्य करून दाखवली आहे. अर्थात काही लोकांनी या तंत्रज्ञानाला आक्षेप घेतला आहे. पण रुग्णाने आपला मेंदू किती नियंत्रित व्हावा हे ठरवणे शक्य असल्याने आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे फिलिप स्टार यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.