मुंबई – आपल्या पतीपासून वेगळे राहण्याचा विचार शिल्पा शेट्टी करायला लागली आहे. शिल्पाच्या एका मैत्रिणीने याबाबतची माहिती दिली आहे. नवरा राज कुंद्राला अश्लील फिल्मस बनवण्याच्या आरोपात तुरुंगात टाकल्यावर शिल्पाने आता दोन्ही मुलांना घेऊन वेगळे राहण्याचा विचार सुरू केला आहे. राज कुंद्राच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही लक्षणे सध्या दिसत नाहीत. उलट या अडचणी दिवसेंदिवस वाढायला लागल्या आहेत.
यातच, पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी साक्षीदार होणार आहे. बहुचर्चित पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं राज कुंद्राविरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. इतकच नाही तर या आरोपपत्रात साक्षीदार म्हणून राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि शर्लिन चोप्रासह तब्बल 55 साक्षीदारांची नावं आहेत. 1500 पानांच्या चार्जशीटसोबत शिल्पा शेट्टीनं दिलेलं स्टेटमेंटही जोडण्यात आलंय.
तत्पूर्वी, राज कुंद्रा अश्लील सिनेमांच्या उद्योगात गुंतला असल्याचे समजल्यावर जेवढा धक्का इतर सर्वजणांना बसला तेवढाच शिल्पालाही बसला आहे. इतके दिवस जी ऐषारामाची लाइफस्टाइल एन्जॉय करते आहे, ती राज कुंद्राच्या या उद्योगाच्या जोरावर होती,
हे सत्य पचवणे शिल्पाला जड जाते आहे. वाईट कामातून मिळालेल्या पैशांपासून आपल्या दोन्ही मुलांना दूर ठेवावे असे आता तिला वाटायला लागले आहे. आता राज कुंद्राच्या एका पैशालाही हात लावायचा नाही, असे तिने ठरवून टाकले आहे.
रिऍलिटी शोचे जज म्हणून याशिवाय “हंगामा 2′ आणि “निकम्मा’ या दोन सिनेमांनंतर आता तिला आणखीन रोलदेखील मिळण्याची संधी आहे. म्हणजे शिल्पाला नवऱ्याच्या पैशावर अवलंबून राहायला लागणार नाही.