Sports In Pune :- पुना क्लब लिमिटेडच्या वतीने आयोजित दहाव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत भार्गव पाठक (नाबाद ६५) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने सेलर्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले. जॅग्वार्स संघाने या स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना फोर ओक्स सेलर्स संघाने ६ षटकात ३ बाद ८७ धावा केल्या. यात रौनक ढोले पाटीलने १८ चेंडूत ५ चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ५१ धावा, तारिक परवानीने १६ चेंडूत ३ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ३० धावा केल्या. जॅग्वार्सकडून सौरभ सिंग (१-६), आकाश दलवाणी (१-१३) याने सुरेख गोलंदाजी केली.
हे आव्हान मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने ५.२ षटकात १ बाद ९० धावा करुन पुर्ण केले. यात भार्गव पाठकने १९ चेंडूत ७ चौकार व ५ षटकारासह नाबाद ६५ धावा काढून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला उमेश पिल्लेने १३ चेंडूत २ चौकार व १ षटकारासह नाबाद २२ धावा काढून साथ दिली.
Virat Kohli : विराट-अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही आलं समोर
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुना क्लबचे अध्यक्ष सुनिल हांडा , पुना क्लबचे उपाध्यक्ष आणि पीसीपीएलचे अध्यक्ष गौरव ढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुना क्लबचे समिती सदस्य मनीष मेहता, शैलेश रांका, नीव नवानी, अमेय कुलकर्णी, तुषार आसवानी, अमित परमार, वीणा मनसुखानी, अक्षय चंदीरमानी, अमित रामनानी, ऋषी चैनानी व रणजित पांडे (स्पर्धा संचालक) आदी उपस्थित होते.