Pooja Sawant: अभिनेत्री पूजा सावंतचा काही दिवसांपूर्वीच सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
पूजा आणि सिद्धेशचा नुकताच संगीत सोहळा पार पडला. पूजा आणि सिद्धेशच्या संगीत सोहळ्याला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे यासह अनेक कलाकरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. संगीत सोहळ्यात पूजा आणि सिद्धेशने रोमँटिक डान्सही केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘साडी के फॉल सा’ या बॉलिवूड गाण्यावर पूजा सिद्धेशबरोबर थिरकताना दिसत आहे. यावेळी तिच्या मित्रपरिवाराने आणि कुटुंबातील सदस्यांनी देखील अप्रतिम डान्स केला.
संगीत सोहळ्यासाठी पूजाने खास डिझायनर लेहेंगा आणि त्यावर खड्यांची ज्वेलरी घालत ग्लॅमरस लूक केला होता. तर सिद्धेशने सूट परिधान केला होता. दरम्यान, पुजा सावंतने मुंबईमध्ये 16 फेब्रुवारीला साखरपुडा आटोपला होता. पूजा आणि सिद्धेश दोघांनीही खास साखरपुड्यासाठी खास मराठमोळा आऊटफिट केला होता. पूजाने साखरपुडा सोहळ्यासाठी हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, हार असा मराठमोळा साज अभिनेत्रीने केला होता. मागील वर्षी 28 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत पूजाने प्रेमाची कबुली दिली होती. तेव्हा पासून तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.