मुंबई – बॉलिवूडची ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. साऊथच्या ‘पोनियिन सेल्वन पार्ट 1’ या चित्रपटात ही ऐश्वर्या ‘राणी नंदिनी’च्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
नुकताच या चित्रपटातील ऐश्वर्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. पोस्टरमध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य चाहत्यांना घायाळ करणारे आहे. मणिरत्नम यांच्या या मॅग्नम ओपस चित्रपटाचा हिंदी टीझर आज म्हणजेच ८ जुलैला संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचा टीझर मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने रिलीज करण्यात येणार आहे. मद्रास टॉकीजच्या सहकार्याने लायका प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. ए आर रहमानने संगीत दिले आहे. ‘पोनियिन सेल्वन पार्ट 1’ जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकबद्दल सांगायचे तर ती पझुवूरची राणी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ऐश्वर्या राणीच्या लूकमध्ये दिसली होती. ऑरेंज सिल्क साडी, नेकपीस, झुमका, मांगटिका, बिंदीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन सुंदर दिसत आहे. या लूकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने तिचे लांब केस खुले ठेवले आहेत. ऐश्वर्याचा हा लूक पाहून चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये जयम रवी, त्रिशा, शरद कुमार, विक्रम बाबू, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘पोनियिन सेल्वन पार्ट 1’ हा एक एपिक पीरियड ड्रामा आहे. जो कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 मध्ये आलेल्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे. ‘पोनियिन सेल्वन’चे बजेट 500 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वात महागडा चित्रपट असेल.