Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

आ. गोरेंच्या मंत्रिपदाला जामिनाचा अडसर?

13 रोजी फैसला; निपटाऱ्यासाठी जोर बैठका

by प्रभात वृत्तसेवा
July 8, 2022 | 10:09 am
A A
जयकुमार गोरेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल

प्रशांत जाधव

सातारा  –राज्यातील सत्तांतरानंतर अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे चित्र आहे. त्यातच प्रत्येक आमदाराने आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी आपापल्या राजकीय “गॉड फादर’कडे वशिला लावला आहे. जिल्ह्यातून भाजपची मुलुखमैदानी तोफ असलेले माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची मोठी तयारी आतापासूनच केली आहे.

मात्र, भाजापमधील खास सुत्रांच्या माहितीनुसार आ. गोरे यांच्या मंत्रिपदाला मायणी येथील जमीन प्रकरणी दाखल गुन्ह्याचा अडसर ठरत असल्याची माहिती आहे. किमान या गुन्ह्यात जामीन करून घेण्याबाबत त्यांना पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्याची माहिती भाजपाच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे दि. 13 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवरच आ. गोरेंच्या मंत्रिपदाचा फैसला होण्याची चिन्हे असल्याने त्यादृष्टीने आ. गोरेंच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

आ. गोरे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असून यापूर्वी ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे मानले जात होते. मात्र, त्यांनी नंतरच्या काळात भाजपशी खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवली. तेव्हाच आ. गोरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. आ. गोरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले असले तरी मतदारसंघाच्या पाणी प्रश्‍नासाठीच आपण पक्ष बदलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. 2019 मध्ये भाजप- शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी मंत्रिपदासाठी तयारी केली होती. यात साताऱ्यातील आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.

मात्र, महाविकास आघाडीचा प्रयोग अचानक समोर आला अन्‌ महाराष्ट्रात नवीन समीकरणे उदयास आली. त्यामुळे या दोन प्रमुख दावेदारांची गोची झाल्याचे पाहयला मिळाले होते. परंतु, राज्यात पुन्हा एकदा “युती’ सरकार आल्याने जिल्ह्यातील या दोन दावेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र, आ. जयकुमार गोरे यांच्यावर मायणी येथील भिसे नावाच्या मृत व्यक्तीला तो जिवंत असल्याचे दाखवून त्याची जमीन त्यांच्या संस्थेला जाणाऱ्या रस्त्याला घेण्यासाठी दहिवडी तहसीलदारांसमोर खोटे प्रतिज्ञापत्र केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी आ. गोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर दहिवडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानंतर आ. गोरेंनी आधी जिल्हा व सत्र न्यायालयात मग उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. या दोन्ही ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सगळे आमदार आपल्यालाच मंत्रिपद मिळावे यासाठी मुंबईत असून ते “वशिला’ लावण्यात व्यस्त आहेत. मात्र, भाजपने विरोधी बाकावर असताना भ्रष्टाचार व गुन्हेगारी प्रवृत्तींशी संबंध असल्याचे आरोप करून महाविकास आघाडीला जेरीस आणले होते. नेमकी तीच परिस्थिती आत्ता सत्ताधारी भाजपला त्यांच्याबाबतीत नको असल्याने आ. गोरेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दाखल गुन्ह्याचा निपटारा करा किंवा जामीन घ्या, त्यानंतर मंत्रिपदाबाबत विचार करण्याचा सल्ला दिल्याचे भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
फडणवीस कोणाचा शब्द पाळणार?
राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या होत्या. सातारा मतदारसंघाच्या सभेवेळी त्यांनी आ.शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्री करणार असल्याची तर माणच्या सभेत “”तुम्ही गोरेंना आमदार करा मी मंत्री करतो” अशी जाहीर साद जनतेला घातली होती. त्यामुळे या सत्तास्थापनेत राज्यातला समतोल राखताना वाट्याला आलेल्या मंत्रिपदातून देवेंद्र फडणवीस नेमका कोणाला दिलेला शब्द पाळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

शिफारस केलेल्या बातम्या

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….
latest-news

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

3 hours ago
पेठ-कळंब हमरस्ता बनलाय यमदुताचे केंद्र
latest-news

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू तर, अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू

3 hours ago
“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला
Top News

“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

3 hours ago
… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा
latest-news

… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा

4 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Most Popular Today

Tags: BJP alliancedevelopmenteknath shindeMAHARASHTRAmahavikas aghadimahavikas aghadi sarkarsanjay rautsatarashambhuraj desaiShinde groupshinde sarkarshiv senathere will be development Bhagatsinh KoshayriUddhav Thackeray

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!