राज्यातल्या 16 मतदार संघांसह 118 मतदार संघात उद्या मतदान

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील 14 मतदार संघांसह देशभरातील एकूण 118 मतदार संघातील प्रचार आज थांबला. आता या मतदारसंघात उद्या दि. 23 रोजी मतदान होत आहे. हे सर्व मतदार संघ देशातल्या मुख्य प्रवाहातील मतदारसंघ असल्याने या टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.या टप्प्यात एकूण सोळा राज्यांमध्ये मतदान होणार आहे. त्याची सर्व जय्यत तयारी निवडणूक प्रशासनाने पुर्ण केली आहे.

उद्या ज्या राज्यांतील मतदार संघांमध्ये निवडणूक होणार आहे त्यात बिहारमधील 5, उत्तरप्रदेशातील 10, आसाम मधील 4, कर्नाटकमधील 14, पश्‍चिम बंगाल मधील 5, ओशिातील 6, गुजरात मधील 26, केरळातील 20, आणि छत्तीसगड मधील सात मतदार संघांचा समावेश आहे. गुजरात या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सर्व 26 मतदार संघांतील मतदानाची प्रक्रिया एकाच दिवसांत पार पडणार आहे. तसेच केरळ मधील 20 मतदार संघांतही मतदान एकाच टप्प्यात होत आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव या केंद्र शासित प्रदेशातील प्रत्येकी एका मतदार संघातही उद्याच मतदान होत असून तामिळनाडुतील वेल्लोर आणि जम्मू काश्‍मीर मधील अनंतनाग मध्येही उद्या मतदान होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.