– अमोल कचरे
यंदा पिफमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक कोस्टा गावरॅस यांची फ्रेंच-ग्रीक फिल्म ‘ऍडल्ट्स इन द रूम’ ही वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये दाखवण्यात आली. वास्तववादी चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोस्टा गावरॅस यांनी या चित्रपटाद्वारे 2015 साली ग्रीस या देशात उद्भवलेली राजकीय परिस्थिती त्यांच्या खास अशा शैलीत दाखवली आहे. म्हणूनच हा चित्रपट वर्ल्ड कॉम्पिटिशन विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारासाठी थेट स्पर्धा करतोय असंच म्हणावं लागेल. जाणून घेऊ यात या चित्रपटाविषयी…
2015 साली ग्रीस देशावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. युरोपातील युरोझोनमधील ग्रीस या देशाचे स्थान डळमळीत झाले होते. अशातच ग्रीसमध्ये सत्तांतर झाले. जो नवीन पक्ष सत्तेवर आला होता, त्यांनी सत्तेवर येताना ग्रीसवासियांना आर्थिक संकटातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे आश्वासन दिलेले असते. पण आधीच्या सरकारने देशाला हजारो कोटींच्या कर्जात ढकललेले असते. ग्रीस देश पूर्णपणे कर्जबाजारी झालेला असतो. बरेच महिने लोकांना पगार मिळत नसतात. बरेच नागरिक नोकरीसाठी देशाबाहेर जाण्याचा मार्ग अवलंबतात. देशाचे नवे अर्थमंत्री यानीस वारूओफेकीस युरोझोनमधील इतर देशांकडे मदतीसाठी खूप प्रयत्न करतात. पण युरोपियन युनियन स्वतःच्या काही अटींवर ठाम राहून ग्रीस देशाला मदत करायला तयार असते.
सहा महिन्यांच्या आतच यानीस त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देतात. त्यांच्या या दरम्यानच्या आठवणींवर कोस्टा गावरॅस यांनी “ऍडल्ट्स इन द रूम’ हा चित्रपट तयार केलाय.
या चित्रपटात कोस्टा यांनी अगदी बिनधास्त पणे जागतिक पातळीवरील राजकीय नेत्यांचा नावासहित उल्लेख केला आहे. याशिवाय जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचे सुद्धा फुटेज दिग्दर्शकांनी खूप शिताफीने वापरले आहे. असा हा सत्य घटनेवर आधारित पॉलिटिकल ड्रामा प्रेक्षकांना चांगलाच गुंतवून ठेवतो. पिफमध्ये आणखी एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचा फील हा चित्रपट देतो.
“ऍडल्ट्स इन द रूम’ या चित्रपटाचे सोमवारी आयनॉक्स बंड गार्डन रोड येथे स्क्रीन 3 वर दुपारी 12 वाजता रिपीट स्क्रिनिंग आहे.
पिफमध्ये आज
सकाळी 11 वा.
वर्ल्ड कॉम्पिटिशन
होमवॉर्ड (युक्रेन) एनएफआय, लॉ कॉलेज रोड
दुपारी 2 वा.
ए सन (ट्युनिशिया, लेबनॉन, कतार) एनएफआय, लॉ कॉलेज रोड
दुपारी 4.30 वा.
द सायन्स ऑफ फिक्शन्स (मलेशिया, इंडोनेशिया) एनएफआय, लॉ कॉलेज रोड
दुपारी 4.30 वा.
मराठी स्पर्धा विभाग
स्माईल प्लिज (दिग्दर्शक : विक्रम फडणीस)
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडी 4 – दुपारी 12.30 वाजता
फोटो फ्रेम (दिग्दर्शक – आदित्य राठी आणि गायत्री पाटील)
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडी 4 – दुपारी 3.30 वाजता
पीव्हीआर पॅव्हेलियन ऑडी 5 – दुपारी 3.45 वाजता
आनंदी गोपाळ (दिग्दर्शक – समीर विद्वांस)
आयनॉक्स, बंड गार्डन रोड स्क्रीन -1 – दुपारी 2 वाजता
इंडियन रेट्रोस्पेक्टिव्ह (हृषीकेश मुखर्जी)
अनुराधा (1960) एनएफआय,
कोथरूड – सकाळी 11 वाजता