मुंबई – दिल्ली भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या “आज के शिवाजी – नरेंद्र मोदी” या पुस्तकाचे काल (दि. १२) प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे.
तसेच या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्याची मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हेमंत ढोमे याने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत म्हणाला कि, “छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना ती सुद्धा भाजप कार्यालयात… पुस्तक काढुन??? जनाची नाही पण किमान मनाची तरी???? आज के शिवाजी? अवमान करण्याची हद्द गाठलीय! तिव्र निषेध!” असा संताप त्याने व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना ती सुद्धा @BJP4Delhi कार्यालयात… पुस्तक काढुन???
जनाची नाही पण किमान मनाची तरी????
आज के शिवाजी? अवमान करण्याची हद्द गाठलीय! तिव्र निषेध! https://t.co/4otwLRsFnj— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) January 12, 2020
दरम्यान, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (दि. १२) भाजप दिल्ली प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमात पार पडला. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी हे नेते उपस्थित होते.