गाडीला जॅमर लावले म्हणून पोलिसाला दमदाटी

नारायणगाव – वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनाला जॅमर लावण्याच्या कारणावरून पोलिसांना दमदाटी करीत धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या एकावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यास बुधवारी (दि. 77) जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

राजेश पांडुरंग भालेराव (वय 45, रा. कळंब, ता. आंबेगाव) असे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्याचे नाव आहे. फिर्याद पोलीस हवालदार रमेश लक्ष्मण काटे नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली. याबाबत माहिती अशी, 16 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास नारायणगाव बस स्थानकासमोरील मुख्य चौकात वाहतूक नियंत्रक पोलीस हवालदार रमेश काठे हे वाहतूक नियमनाचे काम करीत असताना नारायणगाव गावातील रस्त्यावर वाहतूक कोंडी जास्त झाली. तेथे रस्त्यावर लावलेल्या चार चाकी स्कोडा गाडीला (एमएच 17 एझेड 6668) जॅमर लावले असता राजेश भालेराव हे वाहतूक चौकात येऊन दमबाजी केली. त्यावेळी काटे यांनी भालेराव यांना कायदेशीर दंड भरा व गाडी घेऊन जा, असे सांगितले असता भालेरावने धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)