बारामतीतील महिलांच्या उपोषणाला यश

बारामती – शहरात महिलांकरीता स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणी करण्याकरीता सोमवारी (दि. 15) पासून सुरू असणारे महिलांचे उपोषण भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे बुधवारी (दि. 17) सुटले. उपोषणकर्त्या महिलांनी बारामती शहरात नवीन सुचविलेल्या 10 ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीची मागणी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी मान्य करीत लेखी आश्‍वासन दिले आहे.

बाळासाहेब गावडे यांनी मंगळवारी (दि. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर तात्काळ फडणवीस यांनी सचिवांना याबाबत आदेश दिले. त्यानंतर मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी मंगळवारी याबाबत सद्यस्थिती अहवाल व वाढीव उपाययोजना बद्दल उपोषणकर्त्यांना भेटून तसे पत्र दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या वतीने बारामती शहरात अतिरिक्‍त 10 ठिकाणी नवीन स्वच्छतागृह उभारणी करणे व तत्सम मागणी सुचवली होती.

दरम्यान, आज सकाळी उपोषणकर्त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने मुख्याधिकारी व नगराक्षांनी बुधवारी दुपारी 12 वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेऊन काही ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीचे काम सुरू असल्याचे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांबाबत आवश्‍यक दिशा दर्शक फलक लावणे व स्वच्छतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, तसेच उपोषणकर्त्यांनी सुचवलेल्या जागांबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कार्यवाही सुरू करण्यात येईल असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर कांचनत कुल, मुख्याधिकारी कडुसकर व नगराध्यक्ष पोर्णिमा तावरे यांच्या हस्ते उपोषणकर्त्या सुनिता झेंडे, स्वाती कुलकर्णी, सारिका लोंढे, लक्ष्मी मोरे यांना फळांचा रस देऊन उपोषण सोडले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)