नगर – नगर-सोलापूर रस्त्यावर छावणी मंडळाच्या नाक्यावर वाहनचालकांची अडवणूक करून 60 रुपयांची पावती देवून 260 रुपये घेण्याचा प्रकार सुरु असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी पाहणी केली असता त्यांना व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका जनाविरूद्ध भिंगार कॅंम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन सबाजी ठुबे (वय- 42 रा. दरेवाडी ता. नगर) याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेतले आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे पथकासह नगर-सोलापूर रोडने वाळुंज बायपासकडे जात होते. त्यावेळी छावणी मंडळाच्या टोल नाक्यावरील कर्मचारी माल ट्रकच्या (क्र. टी.एन- 52 क्यु- 2127) चालकाला शिवीगाळ केली.
नाक्यावरील कर्मचारी प्रत्येक वाहन चालकाची अडवणूक करून, 260 रूपये घेतात व 60 रूपयाची पावती दिल्याचे मालट्रक चालकानेही पो, नि. मोरे यांच्या लक्षात आणून दिली. मोरे यांनी चौकशी करत असताना दुचाकीवर (क्र. एमएच- 16 सीएन- 1799) अर्जुन ठुबे हा तेथे आला. त्याने चौकशी करणाऱ्या पोलिसांना अडथळा निर्माण करत धक्काबुक्की केली. कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.