बारामती (प्रतिनिधी) – बारामती तालूक्यातील माळेगांव येथील दिव्यांग व सामाजिक कार्यकर्ते मधुकर वाईकर यांची दुचाकी वाहनाचे घेतलेले कर्जफेङ करण्यासाठी बारामती मधील पोलिस कर्मचारी , अधिकारी यांनी जी मोलाची मदत केली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांचा दिव्यांग मधुकर वाईकर यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
अगळ्या वेगळ्या सत्कार समारंभाला बारामती तालूक्यातील अनेक मान्यवर हजेरी लावली. माळेगाव कारखान्याचे माजी संचालक अशोक सस्ते ,तसेच संघटनेचे रुपेश भोसले, कार्याध्यक्ष संजय अहीवळे, उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र पवार ,अभिजित सोनवणे, यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.
दिव्यांग मधुकर वाईकर यांनी नामदेव शिंदे यांना पूष्प व श्रीफळ देवून मनापासून आभार मानले. दिव्यांग व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बारामती मधील पोलिसांनी केलेले सामाजिक कार्य मोलाचे आहे, अशी प्रतिक्रीया वाईकर यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले ,सत्कर्म केलेल्या व्यक्तीचाच सत्कार होते. अशी कृतज्ञता सुध्दा शेवटी मधुकर वाईकर यांनी व्यक्त केली .