बुलंदशहर – अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतिचा पत्नीने प्रियकर आणि भावाच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात घडली आहे. याप्रकरणी पोलीसांनी 48 तासांत तिघांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च रोजी सुनपेडा गावाजवळ एका शेतात एक अनोळखी मृतदेह आढळला होता. ओळख पटवली असता तो मृतदेह काकोड हद्दीतील महमुदपूर कहरी येथील धर्म सिंह यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलीसांनी तपास सुरु केला असता अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने तिचा भाऊ व प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी धर्मसिंह यांची पत्नी, मेव्हणा, आणि पत्नीच्या प्रियकराला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मसिंह हे पत्नी रजनीपेक्षा 10 वर्षांनी मोठे होते. त्यांच्यात सतत भाडणं होत असत. धर्मसिंह पत्नीला दारू पिऊन मारहाण करत असत. त्यामुळे अखेर पत्नी रजनीने प्रियकर व भावाच्या मदतीने धर्मसिंहच्या खूनाचा कट रचला. त्यानुसार, 28 मार्च रोजी रजनीने धर्मसिंह यांना काही वस्तू आणण्यासाठी ककोड येथे पाठवले होते. तेथे नियोजनानुसार तिचा भाऊ शिवम आणि प्रियकर अशोक हजर होता. त्याने धर्मसिंहला दारू पाजली आणि डोक्यात वीट घालून खून केला. त्यानंतर मृतदेह खड्ड्यात फेकला.
शिवमने रचला बनाव –
धर्मसिंह आणि मी दारू पीत होतो. आमच्यात भाडणं झालं. धर्मसिंहला लाथ मारल्याने तो खड्ड्यात पडला. त्याचे डोके वीटेवर आदळल्याने मृत्यू झाला असा बनाव शिवमने रचाला. मात्र, धर्मसिंहच्या पत्नीला ताब्यात घेऊन कसून चौकशी करताच तिने गुन्ह्याची कबूली दिली.