लोणी काळभोर (वार्ताहर)- येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी (गुन्हे) दत्ताराम गोपीनाथ बागवे यांची नियुक्ती करण्यात आली. या संदर्भातील आदेश पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केला.
सुभाष काळे यांची फेब्रुवारी महिन्यात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. आता त्यांच्या जागेवर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी नियुक्ती करण्यात आली. दत्ताराम बागवे यांची प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे. दत्ताराम बागवे यांनी वारजे माळवाडी, उत्तम नगर व विशेष शाखेत कार्यरत असताना, आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. दत्ताराम बागवे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या कामांमुळे ते लोकप्रिय आहेत.