कुरुळी, खराबवाडी, खालुंब्रेत पोलीस मदत केंद्र

पोलीस निरीक्षक सोनटक्के : लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन

चिंबळी – चाकण हद्दीतील महाळुंगे पोलीस चौकीअंतर्गत येत असलेल्या 16 गावांपैकी कुरुळी, खराबवाडी, खालुंब्रे या तीन गावांमध्ये पोलीस मदत केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.

खेड तालुक्‍यातील चाकण हद्दीतील महाळुंगे पोलीस चौकीत नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी गावभेट दौरा आयोजित करून कुरूळी येथे ग्रामस्थांच्या व यात्रा कमिटीच्या वतीने काळअष्टमीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच सचिन कड, उपसरपंच विजय कांबळे, बाळासाहेब सोनवणे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष एम. के. सोनवणे, चंद्रकात बधाले, देवराम सोनवणे, मल्हारी बागडे, बाळासाहेब बागडे, एकनाथ सोनवणे, अमित मुऱ्हे, शरद मुऱ्हे, विद्या बागडे, सुभद्रा सोनवणे, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, शिवाजी सोनवणे, संजय मुऱ्हे, संभाजी सोनवणे, सुदाम मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

बालाजी सोनटक्के म्हणाले की, या परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे छोट्या-मोठ्या कंपन्या, तसेच गोदामाची संख्या वाढली असल्याने व्यवसाय व नोकरी करण्यासाठी रहदारीत वाढ झाली आहे. कुरुळी गावाची लोकसंख्या 25 हजारांपेक्षा अधिक असून, घरमालंकांनी भाडेकरूंची सर्व माहिती दिली पाहिजे.

या भागातील एमआयडीसी व गावातील अतंर्गत रस्ते लहान असल्याने येथे वाहतूककोंडी होते, अशा तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून एम. के. सोनवणे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.