नगरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : 35 देशांचा सहभाग

नगर फिल्म फाउंडेशनच्या वतीने जानेवारी 2020 मध्ये आयोजन; महोत्सवास गोल्ड मानाकंन प्राप्त

नगर – नगर फिल्म फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 3 ते 5 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आलेले असून या मोहत्सवामधे आत्तापर्यंत 35 देशामधून 150 चित्रपटांचा सहभाग झालेला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या यादीत नगर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास गोल्ड मानांकन प्राप्त झाले आहे.

विविध देशातील वेगवेगळ्या विषयांवर आधारीत असलेल्या व तिथल्या संस्कृतीचे विश्‍लेषण करणाऱ्या, तिथल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे लघुपट व चित्रपट या महोत्सवा दरम्यान नगरच्या चित्रपट रसिकांना पहायला मिळणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर या महोत्सवाच्या आयोजनास सहकार्य करीत आहेत.

तसेच चित्रपट आणि लघुपट निवड समीतीचे अध्यक्ष म्हनुन प्राख्यात चित्रपट समीक्षक प्राध्यापक संतोष पठारे यानी पदभार स्वीकारला असून त्यांच्या सोबत दिग्दर्शिका वैशाली केंदळे, व न्यु आर्टस कॉमर्स ऍन्ड सायन्स कॉलेजच्या संज्ञापन आभ्यास विभाग प्रमुख प्राध्यापक संदिप गिर्हे हे देखील या समीतीचे कार्य पाहणार आहेत. विशेष कौतुकाची बाब म्हणजे काही राष्ट्रांकडून ऑस्करसाठी पाठवलेले चित्रपट देखील या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून गतवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील महत्त्वपूर्ण सहकार्य आणि योगदान असावे यासाठी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात सहभागी होणाऱ्या चित्रपट संस्था, आणि नगर मधील कलाकारांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे असे चित्रपट महामंडळाचे जिल्हा समन्वयक तथा सर्व विभाग प्रमुख शशीकांत नजान यांनी सांगितले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने नगर मधे चित्रपट उद्योगाला चालना मिळावी या हेतूने नगर मधील सर्व अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायीका, दिग्दर्शक, लेखक, वादक, मेकप आर्टिस्ट, वेशभूषाकार, छायाचित्रकार, गितकार, संवादलेखक, कलादिग्दर्शक आदी, तसेच विविध तज्ञांची माहीती असलेलीडिरेक्‍टरी प्रकाशीत केली जाणार आहे.

ह्या डिरेक्‍टरीमधे नावनोंदणी मोफत असून नगर जिल्ह्यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांनी आपली सपूर्ण माहीती, फोटो (पुर्ण नाव, पत्ता, फोन नंबर, मेल, केलेल्या कामाची माहीती, केलेल्या कामाची लिंक, फेसबुक प्रोफाईल ची लिंक) आसे आवाहन नगर फाउंडेशनच्या वतीने सचिव प्रशांत जठार यांनी केले आहे.
नगर फिल्म फाउंडेशन चा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ नगर हा महोत्सव आपल्या शहराची ओळख झाली असून उत्कृष्ट नियोजन, तज्ज्ञ परीक्षक, चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे सहकार्य आणि सहभाग, चित्रपट महामंडळाचे पाठबळ, आणि जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्राचा संयोजनात सहभाग या मुळे भविष्यात मोठा दर्जा प्राप्त होणार आहे.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अमोल खोले, सारंग देशपांडे, शैलेश थोरात, गणेश लिमकर, प्रितम होणराव, प्रा. डॉ.कौस्तुभ यादव, मंगेश जोंधळे, शैलेश देशमुख, राहुल उजागरे, स्वप्नील नजान, प्रशांत गुळवे, उद्धव काळापहाड, विराज मुनोत, तुषार देशमुख, साक्षी व्यवहारे, खुशबू पायमोडे, सिद्धी कुलकर्णी, तुषार चोरडिया, पियुष कांबळे, सिद्धार्थ खंडागळे, सुदर्शन कुलकर्णी, पोपट पिटेकर, वसी खान, प्रा. योगेश विलायते, आदी पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)