पुणे – स्वारगेट बस स्थानक परिसरात आईसोबत झोपलेल्या एका चार वर्षाच्या मुलीचे गुरूवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ तिचे फोटो आणि माहिती व्हॉट्स ऍपवरून व्हायरल केले.
गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके मुलीचा शोध घेत असतांना एका तरुणाला फोटत दिसणारी मुलगी सासवड पीएमपी बस स्थानकावर एका व्यक्तीसोबत दिसली.
त्याने याबाबत सासवड पोलिसांना कळविल्यानतंर आरोपी विलास कांबळे (रा.परभणी) याला सासवड पोलिसांनी पकडून त्या मुलीची सुटका केली.
आरोपीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने पैशासाठी विक्री करण्याच्या हेतूने मुलीचे अपहरण केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता सो पुणे शहर, मा.पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे पुणे शहर मा.अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे पश्चिम प्रादेशिक
विभाग,पुणे शहर, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे,सागर पाटील पोलीस उपआयुक्त
परिमंडळ २,.पोलीस आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, मसपोनि शेख, सपोनि जमदाडे, सपोनि रसाळ, मपोउपनि त्र्यंबके, पोउपनि आदलिंग, पोउपनि मोरे, पोउपनि लोहोटे व स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील
पोलीस हवालदार कुंभार, .बडे, .बोखारे, मनोज भोकरे, .ढावरे, साळवे, .कांबळे, उंडे,.शितकाल,.दळवी, पो.ना.घोडके, .पाटील, .मुढे यांच्या पथकाने कागगिरी केली.