कार्ला – महाराष्ट्रात विविध कारणासाठी व आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास परिस्थिती कशी हातळायची याचे प्रत्याक्षिक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने कार्ला फाटा येथे करण्यात आले. यावेळी एका हातात ढाल आणि दुस–या हातात काठी घेऊन पोलीस प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आलेल्या जवळ आले आणि काही नागरिकांची अक्षरशः पळापळ झाली.
सध्या राज्यात विविध मागण्यासांठी सामाजिक संघटनांची आंदोलने सुरू आहेत. त्यातच मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. तर मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले नाही तर या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यत आहे. अशी कोणतीही दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांनी ती कशी हाताळावी, यासाठी पोलिसांकडून दंगा काबू योजनेचे प्रात्याक्षिक घेण्यात येत आहे. तसेच आगामी काळात पोलीस संचलनही काढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षात दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास अग्निशामक दल, आरोग्य विभाग आणि पोलीस दलाचे कार्य काय असते याची प्रत्यक्षात रंगीत तालीम करण्यात आली.
दंगा काबू योजनेचे हे प्रात्याक्षिक लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांंच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, लोणावळा शहर सिताराम डुबल, कामशेत रवि पाटील, वडगावचे कुमार कदम, सहाय्यक निरिक्षक किशोर शिवते, भारत भोसले, सागर आरगडे यांंच्यासह पोलीस दलातील कर्मचारी सहभागी झाले होते.