पुणे- करोनामुळे शहर पोलीस दलातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच आता कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यु झाला. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. करोनामुळे पुणे पोलीस दलातील झालेला हा सातवा मृत्यू आहे.
संतोष जगन्नाथ गायकवाड (वय 58 ) असे मृत्यू झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.
गायकवाड हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. 31 ऑगस्टला ते पोलीस दलातून निवृत्त झाले होते. निवृत्तीच्या दिवशीच त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते.