मुंबई – शिवसेनेचे जेष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः शिंदे यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून माहिती दिली. शिंदे यांनी कोरोना लक्षणं जाणवल्याने काल चाचणी करून घेतली होती. चाचणीचा अहवाल आज सकाळी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. आदित्य यांनी ट्विटद्वारे, एकनाथ शिंदे यांना, पूर्ण बरे होईपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला.
आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी, “काळजी घ्या एकनाथ शिंदेजी! गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा!” असा संदेश लिहला आहे.
काळजी घ्या @mieknathshinde जी!
गेले ६ महिने कोरोना विरुद्धचा लढा आपण देखील फ्रंटलाईन वरूनच लढत आहात. आपण लवकर बरे होऊन महाराष्ट्राच्या सेवेत रुजू व्हाल ही मला खात्री आहेच, पण पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा! https://t.co/1NEeSzsPh3
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 24, 2020
तत्पूर्वी, मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे दिली. ट्विटद्वारे त्यांनी, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…” असं आवाहन केलं.
काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020