नवी दिल्ली – शाळेच्या फाटकावर ‘आय लव्ह मनीष सिसोदिया’ असे बॅनर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका सरकारी शाळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात स्थानिक रहिवाशांनी असे बॅनर लावण्याच्या विरोधात निदर्शने केली.
यानंतर लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर, शास्त्री पार्क पोलिस स्टेशनमध्ये दिल्ली प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी स्थानिक रहिवासी दिवाकर पांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारदार दिवाकर पांडे यांनी सांगितले की, 3 मार्च रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास आम आदमी पार्टीचे (आप) काही कार्यकर्ते शास्त्री पार्कमधील सरकारी शाळेच्या फाटकावर बॅनर लावत होते. सर्वप्रथम त्यांनी शाळेतील एक डेस्क काढून बाहेर आणला, त्यावर चढून गेटवर ‘आय लव्ह मनीष सिसोदिया’चे पोस्टर लावले. त्यावर लोकांनी आक्षेप घेतला आणि सांगितले की, हे शिक्षणाचे मंदिर आहे. ते राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.
ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत – मुख्यमंत्री शिंदे
तक्रारदार दिवाकर म्हणाले की, बॅनर लावणाऱ्यांना परवानगी आहे का, असे विचारले असता, त्यांनी आमदार अब्दुल रहमान यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले. यानंतर एका व्यक्तीने आमदाराकडे जाऊन परवानगी दिली का, असे विचारले, त्याला आमदाराने होकारार्थी उत्तर दिले. आमदार खोटे बोलत आहेत हे आम्हाला माहीत आहे, कारण कोणत्याही राजकीय फायद्यासाठी शाळेचा वापर करणे कधीही मान्य नाही. लोकांनी विरोध केल्यानंतर बॅनर काढण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.