पंतप्रधान मोदींचा 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली : देशातील वाढता कोरोना प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. येत्या 20 मे रोजी व्हिडीओ कॉन्सफन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधतील. यावेळी ते महाराष्ट्रासह 10 राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी 20 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी महाराष्ट्रासह कोरोनामुळे प्रभावित 10 राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. यात ते वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करावेत, कोरोना लसीकरण कसे वाढवू शकतो, याशिवाय विविध विषयांवर संवाद साधतील.

पंतप्रधान मोदी 20 मे रोजी सकाळी 11 वाजता ही बैठक घेतील. यावेळी 54 जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्रासह इतर कोणकोणत्या दहा राज्यातील जिल्हाधिकारी सहभागी होतील, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान देशातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 14 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 62 हजार 727 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 120 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले सलग दोन दिवस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.