पीएम नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक 38 देशात होणार प्रदर्शित

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट हा 38 देशात प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटेन, कॅनाडा, आॅस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमीरात या देशांचा समावेश आहे.

चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी फक्त भारतीयच नाहीत तर जगभरातील चित्रपटचाहते उत्सुक आहे. त्यामुळे आम्ही हा चित्रपट केवळ भारतातच नाहीतर कमीत कमी 38 देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा चित्रपट भारतामध्ये 1700 स्क्रिनवर तर बाहेरच्या देशात 600 स्क्रिनवर प्रदर्शित करण्याचे नियोजन केले असून हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तामिळ भाषेतसुध्दा प्रदर्शित होणार असल्याची माहिती आनंद पंडित यांनी दिली आहे.

दरम्यान, या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये लहानपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंत मोदींचा प्रवास दाखविण्यात आला आहे. पीएम मोदी या चित्रपटात विवेक ओबेरॉय मध्यवर्ती भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेक ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.