नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली टॅगलाईन आणि थीम साँग प्रसिद्ध केले आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
दरम्यान, जेटली म्हणाले भाजपा तीन संकल्पनेवर काम करत असून पहिली संकल्पना ही ‘काम करणारे सरकार’, दुसरी ‘प्रामाणिक सरकार’ आणि तिसरी ‘मोठे निर्णय घेणारे सरकार’ अशा तीन संकल्पना आहेत. ‘अबकी बार फिर मोदी सरकार’ ही त्यांची यावेळची नवीन टॅगलाईन असेल. ‘राष्ट्रीय सुरक्षा, महिला सशक्तीकरण, पंतप्रधान किसान योजना, काळ्या पैशाविरोधातील लढाई आणि सामाजिक योजनांवर सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचे जेटली म्हणाले.
Delhi: BJP releases party's tag line and theme song for the #LokSabhaElections2019 pic.twitter.com/wbRKzp92wX
— ANI (@ANI) April 7, 2019
चलो फिर एक बार हम मोदी सरकार बनाते हैं,
चलो मिलकर साथ आगे देश को बढ़ाते हैं। #PhirEkBaarModiSarkar #IsBaarPhirModi pic.twitter.com/6I5vi6B71Y
— BJP (@BJP4India) April 7, 2019