नवी दिल्ली – नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यावेळी ते मुंबई दौऱ्यावर होते. दरम्यान, पंतप्रधान यांचा मुंबई दौरा झाल्यावर आता ते आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी त्रिपुराला जाणार आहेत. आज शनिवारी पंतप्रधान त्रिपुरा मध्ये दाखल होणार आहेत.
त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला 60 जागांसाठी निवडणूक होणार असून, येथे पंतप्रधान मोदी दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. त्रिपुरातील अंबासा आणि गोमती येथे ही निवडणूक सभा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी दुपारी 12 च्या सुमारास धलाई जिल्ह्यातील अंबासा येथे पहिल्या सभेला संबोधित करतील.
यानंतर दुपारी तीन वाजता गोमती येथील दुसऱ्या सभेला संबोधित करणार असल्याचं भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी महेश शर्मा यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील एक ट्विट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.