PM Modi On Sam Pitroda । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वारसा संपत्तीच्या विधानावरून जोरदार हल्लाबोल केलाय. याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींनी,”तुम्ही तुमच्या मेहनतीने जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना देणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसचा पंजा तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेईल. “कांग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी” हा काँग्रेसचा मंत्र आहे. असे म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीका केली
छत्तीसगडमधील सुरगुजा आयोजित सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका आहे. याविषयी बोलताना “तुम्ही जिवंत असेपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावेल आणि तुम्ही हयात नसाल तेव्हा तुमच्यावर वारसा कराचा बोजा लादला जाईल.” ज्यांनी संपूर्ण काँग्रेसला आपली वडिलोपार्जित संपत्ती मानून ती आपल्या मुलांना दिली, त्यांनी आता भारतीयांनी आपली मालमत्ता आपल्या मुलांना द्यायची नाही.
आता वारसा कर लागू करणार
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, “राजघराण्यातील राजपुत्राच्या सल्लागाराने काही काळापूर्वी मध्यमवर्गीयांवर अधिक कर लादले जावेत, असे म्हटले होते. आता हे लोक एक पाऊल पुढे गेले आहेत. आता वारसा कर लागू करणार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पालकांकडून मिळालेल्या वारसाहक्कावरही कर लावणार, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी वारसा करावर विधान केले आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले सॅम पित्रोदा? PM Modi On Sam Pitroda ।
वारसा कराचा संदर्भ देत सॅम पित्रोदा म्हणाले की, “अमेरिकेत 55 टक्के वारसा कर आकारला जातो. सरकार ५५ टक्के हिस्सा घेते. ही मालमत्ता जनतेसाठी सोडली पाहिजे, असे ते म्हणाले. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर, 45 टक्के मालमत्ता त्याच्या मुलांकडे आणि 55 टक्के सरकारकडे जाते. भारतात अशा कायद्याची चर्चा व्हायला हवी, असे पित्रोदा म्हणाले. सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर केले आहे.