मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत असं धक्कादायक विधान एका भाजपच्या महिला नेत्यांनी केलं आहे. तसेच त्यांना हवे तितके वेळ ते पंतप्रधान राहू शकतात असंही या नेत्याचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट शिक्षण मंत्री गुलाब देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
देशात अल्पसंख्याक व्यक्तीला पंतप्रधान बनवण्यासाठी अनेक नेते शिफारस करत आहेत, याबाबत तुम्हाला काय वाटत असं गुलाब देवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ही लोकशाही आहे, इथे कोणीही काहीही बोलू करू शकतो, कोणतेही बंधन नाही. याला आपण फारसे महत्त्व देत नाही आणि पंतप्रधान मोदी हे एक अवतारी आहेत.
यूपीच्या संभल जिल्ह्यातील चंदौसी विधानसभेचे भाजप आमदार आणि योगी सरकारचे माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवी या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी हे देवाचे अवतार असल्याचे म्हंटले आहे.
काय म्हणाल्या महिला नेत्या नेमकं यावेळी
ते विलक्षण प्रतिभेचे लोक आहेत. त्यांच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही.
त्यांची इच्छा असेल, तर त्यांचे आयुष्य असेपर्यंत ते पंतप्रधान राहतील.
मी म्हणते ते एक अवतार आहेत, देवाने त्याला आपला प्रतिनिधी म्हणून इथे पाठवले आहे.
त्यांना वाटलं तर ते घंटा वाजवतात, हवं असेल तर माजिरा वाजवतात. त्यांना जे हवे ते ते करून घेतात.
गुलाब देवी संभलच्या चांदौसी विधानसभेतून 2022 मध्ये चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. गुलाब देवी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. योगी सरकार 1.0 मध्ये त्या राज्यमंत्री पदावर होत्या. तर योगी २.० मध्ये त्यांना माध्यमिक शिक्षण मंत्री करण्यात आले आहे.गुलाब देवी विधानसभा मतदारसंघात ७२% मुस्लिम लोकसंख्या आहे. असे असतानाही त्यांनी तेथून भाजपच्या तिकिटावर चार वेळा निवडणूक जिंकली आहे.