नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 सप्टेंबरला रशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्या दौऱ्यात त्यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल. मोदी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीसाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
भारत आणि रशियाचे संबंध आणखी मजबूूत होण्याच्या दृष्टीने मोदी यांच्या दौऱ्याला महत्व आहे. सध्या पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून भारतविरोधी कांगावा सुरू केला आहे. तो देश आंतरराष्ट्रीय समुदायाला साकडे घालण्याबरोबरच विविध देशांशी संपर्क साधून भारतविरोधी गाऱ्हाणे मांडत आहे.
मात्र, रशियासारखे देश ठामपणे भारताच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यापार्श्वभूमीवरही, मोदींच्या दौऱ्याचे महत्व वाढले आहे.