Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग 2023-24 मध्ये बुधवारी, अर्जुन देशवालच्या शानदार सुपर 10 च्या जोरावर, जयपूर पिंक पँथर्सने SDAT मल्टी पर्पज इनडोअर स्टेडियमवर 10 व्या हंगामातील 43 व्या सामन्यात दबंग दिल्लीशी 32-32 अशी बरोबरी साधली. दरम्यान, दिल्लीला मोठा धक्का बसला असून संघाचा कर्णधार नवीन कुमार गंभीर जखमी झाला आहे.
जयपुर पिंक पैंथर्स 🤝 दबंग दिल्ली
इस ज़बरदस्त घमासान में किस टीम ने जीता आपका दिल❓#ProKabaddi #ProKabaddiLeague #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #JPPvDEL #JaipurPinkPanthers #DabangDelhiKC pic.twitter.com/kFH462P23r
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2023
हाफ टाईमपर्यंत जयपूरचा संघ 12 गुणांनी पिछाडीवर होता, पण नवीन कुमार जखमी होऊन मॅटबाहेर गेल्यानंतर जयपूरने याचा फायदा उठवत उत्तरार्धात शानदार पुनरागमन करत दिल्लीविरुद्ध सातत्याने गुण मिळवण्यास सुरुवात केली.
#PKLSeason10 (#PUNvPAT Match 42) : पुणेरी पलटणचा विजयरथ कायम! पटना पायरेट्सचा उडवला धूव्वा….
जयपूर पिंक पँथर्ससाठी, अर्जुन देशवालने सुपर 10 करताना 13 गुण मिळवले, तर आशू मलिकने दिल्लीसाठी सात गुण मिळवले. जयपूर पिंक पँथर्सचा या मोसमातील आठ सामन्यांमधला हा दुसरा सामना बरोबरीत सुटला आहे.
Ultimate Kho Kho Season 2 (#TYvsRW Match 7) : तेलुगू योद्धासने उडवला राजस्थान वॉरियर्सचा धुव्वा
जयपूर पिंक पँथर्स संघाचे आता 28 गुण झाले असून ते तिसर्या क्रमांकावर आहे. दबंग दिल्लीचा या मोसमातील पहिला सामना बरोबरीत सुटला आहे . दिल्ली संघाचे आता 20 गुण झाले असून ते सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.
दरम्यान, जयपूर पिंक पँथर्ससाठी PKL 10 च्या या सामन्यात, अर्जुन देशवालने सुपर 10 स्कोअर करताना जास्तीत जास्त 12 रेड पॉइंट मिळवले आणि डिफेन्समध्ये, अंकुशने उच्च 5 स्कोअर करताना 7 टॅकल पॉइंट मिळवले. दबंग दिल्ली केसीसाठी, आशु मलिकने सर्वाधिक 7 रेड पॉइंट घेतले आणि बचावात विशाल भारद्वाज आणि मोहितने 3-3 टॅकल पॉइंट घेतले.