Sajid Khan Death – अभिनेता साजिद खान यांनी वयाच्या 70 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते खान गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, या लढाईत साजिद खान अपयशी ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी अभिनेत्याचे निधन झाले. मेहबूब खानच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूच्या पात्राची छोटी भूमिका साकारण्यासाठी साजिद यांना प्रसिद्धी मिळाली होती. ‘माया’ आणि ‘द सिंगिंग फिलिपिना’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधूनही त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती.