भुवनेश्वर – बुधवारी झालेल्या अल्टीमेट खो-खो लीगच्या सातव्या सामन्यात तेलुगू योद्धासने राजस्थान वॉरियर्सचा ३८ – २८ (मध्यंतर २०-१३) असा १० गुणांनी धुव्वा उडवला. राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. राजस्थानच्या पहिल्या तुकडीने ३.०८ मि. संरक्षण करत कडवी लढत दिली व ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. दुसरी तुकडी जवळजवळ पावणे दोन मिनिटात बाद झाली. तर तिसरी तुकडी जवल्जल दीड मिनिटात बाद झाली. या टर्न मध्ये तेलगु योध्दासने ५ आकाशीय सूर मारत एकूण १८ गण असूल केले. सामन्याच्या दुसऱ्या टर्नमध्ये तेलुगू योद्धासच्या पहिल्या तुकडीने जवळजवळ ३.२४ मि. संरक्षण करत ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला.
Dominating to gain the lead, defending to maintain their lead! 🙌
The @TeluguYoddhas seal a convincing victory in their third game! #UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/c5Ab9R8QGW
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) December 27, 2023
दुसरी तुकडीने सुध्दा तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत ड्रीम रन्सचा आणखी १ गुण वसूल केला. या डावात ७ गुणांची बढत तेलुगू योद्धासने मिळवली. मध्यंतरा नंतर राजस्थान वॉरियर्सची पहिली तुकडी पावणे दोन मिनिटाच्या आत ढेर झाली. तर दुसरी तुकडी सुध्दा पावणे दोन मिनिटाच्या आत बाद झाली तर तिसरी तुकडीने तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ संरक्षण करत ड्रीम रन्सचा १ गुण वसूल केला. या टर्न मध्ये तेलुगू योद्धास आक्रमकांनी ३ आकाशीय सूर मारत एकूण १८ गण असूल केले. शेवटच्या व ४ थ्या टर्न मध्ये तेलुगू योद्धासच्या पहिली तुकडी जवळजवळ पावणे तीन मिनिटात बाद झाली.
दुसरी तुकडी सुध्दा जवळजवळ पावणे तीन मिनिटात बाद झाली. तर तिसरी तुकडीने कडवी लढत दिली. मात्र या सामन्यात सुरवाती पासूनच राजस्थान वॉरियर्सला आपली छाप पाडता आली नाही. या सामन्यात सौरभ आडावकरला उत्कृष्ट आक्रमकाचा तर आदित्य गणपुलेला उत्कृष्ट संरक्षकाचा व राहुल मंडलला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शुक्रवारी पहिला सामना राजस्थान वॉरियर्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात तर दुसरा सामना गुजरात जायंट्स व तेलुगू योद्धास यांच्यात रंगणार आहेत.
Ultimate Kho Kho Season 2 (#GGvsRW Match 3) : गुजरात जायंट्सने उडवला राजस्थान वॉरियर्सचा धुव्वा…
सहाव्या सामन्यांपर्यंत चेन्नई क्विक गन्सचा रामजी कस्यप ४.५२ मि. संरक्षण व २२ गुणांसह संरक्षण व आक्रमणात अल्टीमेट खो-खो सीझन २ सध्या प्रथम क्रमांकावर आहे तर तेलुगू योद्धासचा प्रतिक वाईकर वजीर म्हणून १८ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तसेच आकाषीय सूर मारण्यात रामजी कश्यप (६ वेळा), स्तंभात खेळाडू बाद करणे प्रतिक वाईकर (४ वेळा), सहज स्पर्शाने बाद करण्यात गजानन शेंगाळ (१४ गुण), सूर मारून बाद करण्यात प्रतिक वाईकर (१४ गुण) सध्या वरच्या क्रमांकावर आहेत.