भुईंज – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अनवडी, ता. वाई हद्दीतील हौसाई गार्डन या हॉटेलमधून सैनिक रवींद्र परशुराम कोले (रा. जुना आग्रा रोड, ठाणे पश्चिम) यांचे पिस्तूल शनिवारी (दि. 18) सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास चोरीस गेले होते. भुईंज पोलिसांनी या चोरीचा छडा दोनच दिवसांत लावून दोन संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पॉइंट 0.32 एमएम बोअरचे, 85 हजार रुपये किमतीचे पिस्तूलही जप्त करण्यात आले.
रवींद्र कोले हे वॉशरूममध्ये गेले होते. त्यांनी हात व तोंड धुताना पिस्तूल वॉश बेसिनवर काढून ठेवले होते. ते पिस्तूल तेथेच विसरून ते स्वत:च्या कारमधून कुटुंबीयांसमवेत गडहिंग्लजकडे रवाना झाले होते.
हॉटेलपासून नऊ किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पिस्तूल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते परत फिरून हॉटेलमध्ये गेले असता, पिस्तूल चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर