पिंपरी – लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आज (बुधवारी) बंद राहणार असल्याचे महापालिकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वैद्यकीय विभागात काम करणाऱ्या सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर शहरातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. उद्या (बुधवारी) लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी दिली.