- 5 जणांचा मृत्यू ः 90 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 138 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 5 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93515 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी चार वाजेपर्यंत शहरातील 137 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एका रुग्णाला करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 4 व शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत 2353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1668 तर शहराबाहेरील 685 रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील भोसरी, वल्लभनगर, मोशी, थेरगाव येथील 4 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 34 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील बारामती येथील एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 90 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 89747 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2145 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 913 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.