कामशेत, (वार्ताहर) – कामशेत येथे पुणे मुंबई रोडवर एक ज्येष्ठ व्यक्ती व एक वर्षाचा मुलगा रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होते. रस्त्यावरील धावत्या वाहनांमध्ये स्वतःच्या जीवाची परवा न करता होमगार्ड किसन बोंबले यांनी त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले
कामशेतमधील लोणावळा ते पुणे सर्विस रस्त्याने प्रवास करताना अचानक मुख्य रस्त्यावर एक लहान बाळ रडत होते. ते बाळा रस्त्याच्या मधोमध असल्याने रस्त्याने धावणारे वाहनांनी या बाळाला चिरडून टाकले असते. पण होमगार्ड किसन बोंबले तेथे उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता भरधाव रस्त्यामध्ये जाऊन त्याचे मुख्यालय जवळ घेऊन त्याचे प्राण वाचवले.
मी माझ्या जिवाची पर्वा न करता मुलाला रनिंगरोड मधील मोठी वाहने थांबवून मुलाचा जीव वाचवला. तसेच त्याचा आजोबांचा जीव देखील वाचवला. मी माझे भाग्य समजतो आज लोकसेवक यानात्याने मी चिमुकल्याचा जीव वाचवला, असे होमगार्ड कृष्ण बोंबले यांनी सांगितले.