हॉकी : एफसीआय, पिल्ले ऍकॅडमीने गाठली उपांत्य फेरी

पिंपरी  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्‌, सोशल ऍण्ड कल्चरल ऍकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले ऍकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत एफसीआय संघाने एक्‍सलन्सी ऍकॅडमीचा 5-3 असा पराभव केला. एफसीआयच्या व्यंकटेश देवकर याने दोन गोल तर, गुरफान शेख, आकाश पवार व अनुज सिंग यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. एक्‍सलन्सी ऍकॅडमीकडून (विनीत कांबळे याने दोन व विनोद नायर याने एक गोल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिल्ले ऍकॅडमी अ संघाने ग्रीन मेडोज्‌ संघाचे आव्हान 6-0 असे परतावून लावत अंतिम चार संघामध्ये आपले नाव निश्‍चित केले. विजयी संघाकडून युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)