युआयडी कार्ड ग्राह्य धरण्याचे आदेश
पिंपरी – अपंग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (युआयडी) अंतर्गत देण्यात आलेले ओळखपत्र राष्ट्रीय परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या प्रवास सवलतीसाठी ग्राह्य धरावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाने दिल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अपंग आणि दिव्यांगांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या सूचनांची अंमलबजावणी करून त्यांचा आर्थिक तोटा होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे आहे.
दिव्यांग, अपंग व्यक्तींना कायद्यानुसार देण्यात आलेले वैयक्तिक ओळख पत्र युडीआयडी संपूर्ण भारतामध्ये दिव्यांगाचे लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वाहतूक महाव्यवस्थापक यांनी 18 सप्टेंबर 2019 रोजी एका आदेशाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ओळखपत्र युडीआयडी ग्राह्य धरण्याबाबत सर्व विभाग नियंत्रकांना कळवले होते. तर आयुक्तांनी मार्च 2022 मध्ये पूर्वी दिलेले आदेश ग्राह्य धरावेत, असे पत्र आयुक्तांनी दिले आहे.
या विषयी वाकचौरे म्हणाले की, हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी अपंग व्यक्तींना 50 रुपये भरावे लागत आहेत. तसेच हे कार्ड दाखविल्यावर त्यांना 75 ऐवजी 50 टक्केच सवलत मिळते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. नोंदणी करण्यासाठी संबंधितांकडे आधार संलग्न मोबाईल असणे गरजेचे आहे. हे कार्ड दरवर्षी नूतनीकरण करून घ्यावे लागते. तसेच त्यात पैसे असणे बंधनकारक आहे. हे कार्ड ऑनलाइन रिचार्ज करावे लागते, त्याची कोणालाही माहिती नाही. ही किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी सर्वत्र युडीआयडी ग्राह्य धरण्याबाबत केंद्र सरकार आग्रही आहे.
ग्रामीण भागातील अपंगांना त्रास
ग्रामीण भागातील अनेक अपंग व्यक्ती वर्षात एक किंवा दोनदा प्रवास करतात. तर कार्डमध्ये किमान 100 ते 500 रुपयांचे रिचार्स असणे बंधनकारक आहे. ते ऑनलाई करायचे आहे. मात्र, ते कसे करायचे या विषयी माहिती नाही. तसेच कार्डमध्ये पैसे संपल्याचेही कळत नाही. अनेकांची रिचार्ज करण्याची परिस्थितीही नाही. त्यामुळे युडीआडी कार्ड ग्राह्य धरणे, असे वाकचौरे यांनी सांगितले.
अपंगांना नुसतेच सर्व प्रकारचे कार्ड काढण्यास सांगितले जाते. मात्र, सवलती किंवा फायदा मिळत नाही. तसेच ते कार्ड काढण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे युडीआयडी कार्ड सर्वत्र ग्राह्य धरावे व सवलती मिळाव्यात.
– राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन, पिंपरी चिंचवड.