महाराष्ट्रभर रुग्णालयांचे जाळे उभारणार
पुणे, दि. 3 – राजमाता जिजाबाई यांचे स्मारक म्हणून राज्यभर तीस सहकारी इस्पितळाचे जाळे उभारण्याच्या एक कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा शालिनीबाई पाटील यांनी केली. जिजामाता सन्मान समितीच्या या योजनेत शिवछत्रपती प्रतिष्ठानही सहभागी असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानमालेतून उभे राहणारे पाच लाख रुपये या योजनेस दिले जाणार आहेत. यावेळी जिजामातेच्या स्मारकाबद्दलची दुरावस्था सांगताना बाबासाहेब पुरंदरेंनी शिंदखेडच्या जिजामातेच्या जन्मस्थळाची मोठी करुण कहाणी सांगितली.
आज सिक्कीममध्ये हुतात्मा दिन पाळणार
गंगटोक – सिक्कीममध्ये सर्वत्र हुतात्मा दिन पाळण्यात येणार आहे. या संबंधीचा निर्णय 27 मार्च रोजी सिक्कीमच्या मंत्रिमंडळातून घेतला होता. उद्याच चोग्याल यांचा 52वा वाढदिवस जर साजरा करण्यात आला तर त्या समारंभावर सिक्कीम व सरकारी अधिकारी बहिष्कार घालतील. उद्या गंगटोक येथे जाहीर सभा घेऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
एसटी गाडी गेली सासुरवाडी
जुन्नर – मंचर येथे मुक्कामासाठी “आंबेगाव मंबई’ अशी जाणारी गाडी ड्रायव्हरने रात्री आपल्या सासुरवाडीला खुशाल नेली. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली.