पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील ड प्रभागामध्ये आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. या प्रभागामध्ये 24 तासांत 100 नवीन रुग्ण आढळले आहेत.
महापालिकेच्या ड प्रभागाच्या हद्दीमध्ये पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळो सौदागर, कल्पतरु इस्टेट, विशालनगर, पुनावळे या भागांचा समावेश होतो. या भागामध्ये उच्चभ्रू नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. याच भागामध्ये आज करोनाचे सर्वाधिक 100 रुग्ण आढलले आहेत. तर त्याखालोखाल ब प्रभागामध्ये 62, फ प्रभागामध्ये 52 रुग्ण आढळले आहेत. तसेच अ प्रभाग 41, क 48, इ 44, ग 49, व ह प्रभागामध्ये सर्वात कमी 29 रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनाने ज्येष्ठाचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि. 24) करोनाने 71 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. रुग्णालयात नव्याने 3 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.करोनाने मृत्यू झालेले वृद्ध हे केळवडे (ता. भोर) येथील रहिवाशी आहेत. नव्याने करोनाची लागण झालेले रुग्ण हे सांगवी आणि भूगाव येथील आहेत. 2 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. 4 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात सध्या 33 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण 781 रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.