मुंबई – भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा मिळाला आहे. आजची सुनावणी काही कारणाने होऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे.
भोसरी जमीन प्रकरणी एकनाथ खडसे यांना सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीस बजावली होती. या प्रकरणी ईडीच्या कारवाईविरोधात खडसे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी काही कारणाने होऊ न शकल्याने पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम आहे. 8 मार्चपर्यंत हायकोर्टाकडून खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे.
दरम्यान, भाजपला रामराम ठोकून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर 30 डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीला हजर राहायचे होते. ते ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु, करोनाची लागण झाल्यानंतर अखेरीस 15 जानेवारीला ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते.