पिंपरी – रस्त्यावर थांबून लैंगिक हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) तळेगाव दाभाडे येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर करण्यात आली.
सचिन संजीवन शिंदे (वय 29, रा. विश्रांतवाडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 आणि 35 वर्षीय दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने जुन्या पुणे मुंबई महामार्गावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लैंगिक हावभाव करून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.