Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : पोलीस तपास पथकांमध्ये फेरबदलाचे वारे

गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न ! मरगळ झटकण्यासाठी पोलीस आयुक्त घेणार आढावा

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 9:20 am
A A
पिंपरी चिंचवड : पोलीस तपास पथकांमध्ये फेरबदलाचे वारे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या तपास (डीबी) पथकांमध्ये एक प्रकारे मरगळ आली आहे. ही मरगळ वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालणारी ठरू लागली आहे. मरगळ झटकून काम करणे गरजेचे असून सर्व पोलीस ठाण्यातील डीबीच्या पुनर्रचनेबाबत पोलीस आयुक्त लवकरच आढावा घेणार आहेत.

आयुक्तलयातील शिरगाव परंदवडी, तळेगाव एमआयडीसी ही पोलीस ठाणी वगळता प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये डीबी पथक आहे. या पथकाला पोलीस ठाण्याचे नाक समजले जाते. सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची या पथकाच्या प्रमुख पदी नियुक्ती केली जाते. तसेच, दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांची पथकात नेमणूक केली जाते. हद्दीची व गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या पथकामध्ये घेणे अपेक्षित असते. मात्र, अलिकडच्या काळात अधिकाऱ्यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची या पथकामध्ये जास्त प्रमाणात भरती असल्याचे दिसून येते. याचा परिणाम डीबी पथकांच्या कामगिरीवर जाणवू लागला आहे.

हद्दीमध्ये एखादा गुन्हा घडल्यास डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचणे महत्वाचे असते. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित गुन्हेगारांची उचलबांगडी करून चौकशीअंती गुन्हा उघड करण्याची सर्वस्वी जबाबदारी डीबी पथकाची असते. अलिकडच्या काळात गंभीर गुन्हा वगळता डीबी पथकातील कर्मचारी घटनास्थळी फिरकतही नसल्याचे चित्र आहे. गुन्हेगाराला फरफटत आणण्यापेक्षा पोलीस ठाण्यात बसून मध्यस्थांमार्फत आरोपी हजर करण्याला पसंती दिली जात आहे. त्यामुळे आरोपींना डीबी पथकांची भीती उरली नाही.

आयुक्तालयातील सर्व डीबी पथकांबाबत माहिती घेतली जात आहे. डीबीमध्ये सक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यापूर्वी काही पथकांवर कारवाई झाली आहे. त्याचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.
– विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त

गंभीर गुन्ह्यात डीबीची कमतरता जाणवतेय
आयुक्तालयातील वाकड, निगडी, देहूरोड पोलीस ठाण्यातील डीबी पथकांवर झालेल्या कारवाईची कमतरता गंभीर गुन्हे घडल्यानंतर जाणवू लागली आहे. वाकड आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड, कॉलेजमधील राडे आणि वकील अपहरण खून प्रकरणात डीबीची कमतरता जाणवली. स्थानिक पोलिसांना धावपळ करताना मर्यादा येत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ज्या पोलीस ठाण्यांमध्ये डीबी अस्तित्वात आहे, त्यातील काही डीबी पथके काय कामगिरी करतात हे समजणे दुरापास्त होत आहे.

वरिष्ठांची नाराजी अन डीबीचे दुखणे
गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी डीबी पथके कमी पडू लागल्याची नाराजी वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत. मात्र अलिकडच्या काळात शहरात पोलिसांना वारंवार बंदोबस्ताचे काम लागले. आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका, 31 डिसेंबर, इतर सण, उत्सव त्यातच अतिमहत्वाच्या (व्हीआयपी) लोकांची शहरात वाढलेली येजा यामुळे पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस तसेच डीबीचेही पोलीस बंदोबस्तात अडकून पडले. इतर कामांचा ताण वाढल्याने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वेळ मिळत नसल्याची खंत डीबीचे अधिकारी
व्यक्त करतात.

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

शिफारस केलेल्या बातम्या

भंडारा डोंगर परिसराचा विकास आराखडा तयार करा – मुख्यमंत्री
Top News

भंडारा डोंगर परिसराचा विकास आराखडा तयार करा – मुख्यमंत्री

22 hours ago
हिंजवडी येथील आयटी कंपन्यांकडून ‘फ्रेशर्स’ची निराशा ! नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रुजू करण्याकडे दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड

हिंजवडी येथील आयटी कंपन्यांकडून ‘फ्रेशर्स’ची निराशा ! नोकरीसाठी नियुक्‍तीपत्र देऊनही कामावर रुजू करण्याकडे दुर्लक्ष

22 hours ago
पिंपरी चिंचवड : ‘ई-फायलिंग’ प्रणालीस वकिलांचा विरोध
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : ‘ई-फायलिंग’ प्रणालीस वकिलांचा विरोध

22 hours ago
इंद्रायणीत केमिकलयुक्‍त सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई ! पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला आली जाग
Top News

इंद्रायणीत केमिकलयुक्‍त सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई ! पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला आली जाग

22 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

…तर मोदींना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही – प्रकाश आंबेडकर

आईला समाजाने वाळित टाकले मात्र याच सावित्रीच्या लेकीने जिंकून दिला वर्ल्डकप

तुमचेही वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल तर ही बातमी नक्की वाचा

Hindenburg Research: गौतम अदानींच्या कंपन्यांची घसरण सुरूच; तीन दिवसांत ‘इतके’ कोटींचे झाले नुकसान

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

Elections : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; जाणून घ्या…मतदानाची टक्केवारी

Maharashtra : राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Union Budget 2023 : विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत – उपमुख्यमंत्री

शिवसेना, धनुष्यबाणाची लढाई अंतिम टप्प्यात, पाहा आज काय झाला युक्तीवाद

Most Popular Today

Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!