पिंपरी – तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या निषेधार्थ पिंपरीत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. संसदेत भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केल्या बद्दल हा निषेध करण्यात आला. या घटनेचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चित्रण करून टिंगल उडविली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस नामदेव ढाके, शैला मोळक, नगरसेवक माउली थोरात, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, शिवराम पाटील, वैशाली खाडये, रविंद्र नांदुरकर, निलेश अष्टेकर, मधुकर बच्चे, प्रदीपकुमार बेंद्रे, रविंद्र देशपांडे, दिपक भंडारी, आकाश भारती, सचिन काळभोर, गणेश संभेराव, नंदू कदम, संजय बढे, देवराम महाजन, प्रताप सोलंकी, राकेश सिंग ठाकूर, प्रिती कामतीकर, सीमा चव्हाण, प्रज्ञा हितनाळीकर, कैलास सानप, निता कुशारे, पल्लवी मारकड, अलका मकवाना, जयश्री मकवाना, जयश्री काशीद, राजश्री शाह, शाकीर शेख, जयश्री वाघमारे, रफीक खान, गणेश ढाकणे, अजित कुलथे, संजय परळीकर, साहिल जगताप यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, वॉरियर्स, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रसंगी, संवैधानिक पदाचा अवमान करणा-या खासदारांविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.