पिंपरी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून पदयात्रेला शनिवारी सुरुवात केली. ही पदयात्रा बुधवारी (ता. 24) शहरातील सांगवी फाटा येथे येणार आहे. तेथून जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक मार्गे चापेकर चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डीमार्गे भक्ती शक्ती समूह शिल्प येथे पोचेल. ही पदयात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस प्रशासन आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते समन्वयाने नियोजन करत आहेत.
सांगवी फाटा येथे या पदयात्रेचे स्वागत मराठा समाजाचे बांधव करणार आहेत. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना अन्नदान, पाणीवाटप, फळवाटप करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने फिरते स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा इत्यादी स्वरूपाची मदत करणार आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सार्वजनिक मंडळे, दानशूर व्यक्तींनी करावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, नकुल भोईर, अरुण पवार, सचिन बारणे, गणेश देवराम, विजय काकडे, राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र चिंचवडे, विनोद कलाटे, निखिल भंडारे, तुकाराम कलाटे, मनोज मोरे, हरीश मोरे, सुभाष साळुंखे, सागर चिंचवडे, मीरा कदम, प्रशांत जाधव, हेमंत गडसिंग, भूपेंद्र गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते विशेष परिश्रम करत आहेत.