पिंपरी – इन्डो ॲथलेटिक्स सोसायटीने निगडी ते लोणावळा अशी घेण्यात आलेल्या आठव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १२०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
इन्डो अथलेटिक्स सोसायटी यांच्यामार्फत दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.यावेळी उद्योजक अण्णा बिरादार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. विजय सातव, डॉ. दिलीप कामत, डॉ. सुहास माटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हेमंत हरहरे, क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे , उन्नती सोशल फाउंडेशनचे संजय भिसे , आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल यांनी झेंडा दाखवून फेरीला सुरुवात केली.
पुणे, पिंपरी चिंचवड,अहमदनगर, नारायणगाव, उदगीर, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकल प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुणे ते गुजरात प्रवास केलेले सुहास गदादे, संतोष झेंडे, शंतनू निगडे यांचा सत्कार पोलीस अधिकारी अजय दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पुणे ते कन्याकुमारी प्रवास केलेल्या सात जणांपैकी संदीप परदेशी, रणजीत सिंह, शंभरहून अधिक वेळा रक्तदान केलेले अभय खटावकर, आयर्न मॅन स्वप्निल चिंचवडे व सचिन वाकडकर, पुणे ते केदारनाथ प्रवास केलेले स्वप्निल भुमकर ,राघवेंद्र बेनाडे यांचा सत्कार करण्यात आला.
नियोजन इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गिरीराज उमरीकर, रमेश माने, अमृता पाटील, रवींद्र पाटील, सुधाकर टिळेकर आदींनी सहभाग घेतला. कपिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.