पुणे – कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवाच्या निमित्ताने एसटीच्या पुणे विभागाकडून आळंदी येथून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. ९ डिसेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. तर, ११ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सव सोहळा आहे. यासाठी एसटीकडून आळंदी मुख्य बस स्थानकातून वेगवेगळ्या शहरांसाठी थेट बस असणार आहे, असे एसटीचे पुणे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले.
-आळंदी मुख्य बस स्थानकातून सुटणाऱ्या बस : स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, रायगड, ठाणे, पालघर
– आळंदी-चाकण मार्गावरील बसस्थानकः राजगुरुनगर, नारायणगाव, संगमनेर, नाशिक, मुरबाड, कल्याण, कोपरगांव, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे
– आळंदी-वडगांव घेनंद मार्गावरील बसस्थानक : शिक्रापूर, शिरुर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नांदेड, बीड, परभणी, नागपूर, जळगांव
– डुडुळगांव वाहतूक पोलीस चौकी बसस्थानक : आळंदी-देहू मार्गावरील फेऱ्या सुटतील.