पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर, शनिवारी रात्री ८ नंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे काहीसा गारवा निर्माण झाला.
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात चढ-उतार होता. तर, पुढील आठवडाभर हवामान ढगाळ राहून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. तर, १९ ते २५ जानेवारी या कालावधीत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त रहिला.
तर, २६ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत आठवड्यात किमान तापमान सरासरी इतके रहाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवार, रविवारी काही भागात पावसाच्या सरी कोसळतील आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.