पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे येथे झालेल्या नॅशनल यथ गेम्स 2025-26 गौरी गणेश महाजन हिने योगासन या खेळात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकांची मानकरी ठरली आहे. तसेच या स्पर्धेत सर्वात जास्त सुवर्ण पदके मिळविल्याबद्दल सर्वसाधारण विजेतेपद सुद्धा पटकावले आहे. ती चॅम्पियन शिपच्या ट्रॉफीची मानकरी ठरली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील एसीएस ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील, शैक्षणिक संकुलचे डायरेक्टर रेअर ॲडमिरल अमित विक्रम, वित्त अधिकारी बिपीन शर्मा, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. एच. डी. बिरादार व इतर शिक्षक वर्गांनी कौतुक केले आहे. तसेच तिच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना अभिनंदन केले आहे.